तारदाळमधील प्रथमेश करतोय नेव्हीमध्ये देशसेवा प्रतिकुल परिस्थितीवर मातकरत कॅप्टनपदी रूजू

 तारदाळमधील प्रथमेश करतोय नेव्हीमध्ये देशसेवा प्रतिकुल परिस्थितीवर मातकरत कॅप्टनपदी रूजू


हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील प्रथमेश धनाजी शिंदे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इंडियन नेव्हीमध्ये रूजू झाला. आणि अल्पावधीतच प्रचंड कष्ट, जिद्द आणि देशसेवा करण्याच्या हेतूने कार्यरत असणाऱ्या प्रथमेश याने नुकताच इंडियन नेव्हीच्या कॅप्टनपदाची धुरा हाती घेतली आहे. तारदाळसारख्या ग्रामीण खेड्यातून केवळ जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर सामान्य विद्यार्थी यशाला कशाप्रकारे गवसणी घालतो याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. त्याच्या या यशाने तारदाळ परिसरातून कौतूक होत आहे. प्रथमेशचे प्राथमिक शिक्षण खोतवाडी हायस्कूल, अभियांत्रिकिचे शिक्षण दत्त पॉलिटेक्नीक शिरोळ, डीग्रीचे शिक्षण शरद इंजिनिअरींग कॉलेज येथे झाले. असा प्रवास करीत अखेर प्रचंड मेहनत, व्यायाम व सातत्य यामुळे त्याची निवड इंडियन नेव्हीमध्ये झाली. प्रामाणिकपणा व देशसेवेचे ध्येय घेतलेल्या प्रथमेशची नुकतीच इंडियन नेव्हीच्या कॅप्टनपदी निवड करण्यात आली. त्याला या यशासाठी आई-वडिल, आजी- आजोबा, त्याचे शिक्षक, मित्र परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post