मराठा हायकर्सतर्फे हिमालयीन ट्रेकची मोहिम
येथील मराठा हायकर्सने हिमालयीन ट्रेक बुरान घाटी पास आयोजित केला आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंड मध्ये पसरलेली बुरान घाटी जैवविविधतेने नटलेली आणि बर्फाच्छादीत आहे. १५००० हजार फूट उंचीवर असलेली बुरान घाटी पास सर करण्यासाठी मराठा हायकर्सतर्फे १५ जणांची एक टीम नुकतीच रवाना झाली. मोहिमेचे नेतृत्व संघटनेतर्फे माधव खेबूडे व विष्णू जठार करीत आहेत. याशिवाय इतर सदस्य म्हणून अनुज जठार, सार्थ जठार, अर्णव काजवे, कुशल माळी, संतोष गदाळे, राजू तराळ, संजय पाटील सांगली व विवेकानंद सोनटक्के या १२ ते ६५ वयोगटातील सदस्यांचा यात समावेश आहे. उल्लेखनिय म्हणजे यामध्ये गीत महादर सातारा, आर्या कोरिगिरी, अंजली कोरिगिरी, श्रेया वठारे व सुप्रिया पाटील या मुलींचाही समावेश आहे. सदर टीम ला संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. यामध्ये महेश जाधव, अमर बुचडे, पंढरीनाथ फाटक, आनंदा थोरवत, रमेश थोरवत, नरेंद्र जाधव इत्यादींचा समावेश आहे.