नागपूर येथील निहाल कुर्वे हा नागपूर येथील प्रहार मिलिटरी स्कूल इयत्ता दहावी मध्ये शिक्षण घेत आहे तर कुमारी काव्या ही विहीरगाव नागपूर येथील प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल इयत्ता सातवी मध्ये शिक्षण घेत आहे या दोघा बहिण भावांनी शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ बेळगाव कर्नाटक द्वारा उमरेड स्केटिंग अकादमी उमरेड नागपूर यांच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अमृत काल इनडिपीडन्स डे स्केटिंग रेली मँरेथोन या स्केटिंग प्रकारात एकाच दिवशी या बहिण भावांनी तीन वर्ल्ड रेकॉर्ड केले यामध्ये नॅशनल रेकॉर्ड्स, एक्स्ट्रीम रेकॉर्डस, ए.एस.आय.ए.पायफीक रेकॉर्डस् या जागतिक तीन वर्ड रेकॉर्डमध्ये या दोघांची नोंद झाली आहे सदर विक्रम मोस्ट नंबर ऑफ स्केटर्स परफॉर्मिंग ऑफ फाईव्ह हवर्स एट द सेम टाईम ऑन मल्टिपल विन्यूज ऑल ओवर इंडिया यासाठी करण्यात आली आहे. निहाल व काव्या या दोघांना तिचे वडील यशवंत रामदास जी कुर्वे यांचे नेहमी मार्गदर्शन लाभते. दोघा बहिण भावांनी केलेल्या या जागतिक रेकॉर्ड बद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
वसुंधरा शक्ती न्युजसाठी कोल्हापूरहून विजय तोडकर