महिला व बालकल्याण विभाग योजनांचा लाभ देण्यासाठी एक दिवसीय शिबिर : संगायो अध्यक्ष श्री.अनिल डाळ्या



भारतीय जनता पार्टी, इचलकरंजी यांच्यावतीने महिला आणि बालकल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती आणि लाभ मिळवून देण्यासाठी माजी आमदार श्री सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजीत एक दिवशीय शिबीर आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संगायो अध्यक्ष मा. श्री. अनिल डाळ्या यांनी दिली आहे. शिबिराच्या ठिकाणी माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी, सुकन्या आदि या योजनांची सविस्तर माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लाभार्थ्यांना दिली जाणार आहे. विशेष करून यावेळी बालसंगोपन योजनेअंतर्गत पात्र मुलांचे फॉर्म भरून सर्व कागदपत्रांची पूर्तता केली जाणार आहे.बाल संगोपन योजने अंतर्गत आई किवा वडील अथवा दोघेही पालक मयत असणाऱ्या मुलांना शालेय खर्चासाठी दर महा ठरविक रक्कम मिळते. शिबिर उद्या शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट भाजपा कार्यालय इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे. तरी नागरिकांनी याचा मोठ्या प्रमाणावर लाभ घ्यावा असे आवाहन भारतीय जनता पार्टी, इचलकरंजी च्या वतीने केले आहे. शिबिराची वेळ सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 राहिल.अधिक माहितीसाठी भाजपा इचलकरंजी, कार्यालय येथे संपर्क करावा. काय आहे बालसंगोपन योजना? आई किंवा वडील अथवा दोघेही पालक मयत असलेल्या मुलांना मासिक आर्थिक लाभ दिला जातो. पालकांना गंभीर, असाध्य आजार असेल आणि जर त्यामुळे ते कमावण्यास पात्र नसतील अशा वेळीही या योजनेचा लाभ मुलांना मिळेल.

 कोणती कागदपत्रे लागतील ?

1.मुलाचा जन्म दाखला झेरॉक्स. 2.पालकांचा मृत्यू दाखला झेरॉक्स. 3.तलाठी उत्पन्न दाखला. 4.रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र झेरॉक्स. 5.मुलाचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट. 6.अर्जदाराचा लाभार्थी (मुले) समवेत घराचे दर्शनी भागाचा फोटो. 7.राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स. 8.पालक व मुलांचे आधार कार्ड झेरॉक्स. 9.दोन प्रतिष्ठित व्यक्तींचे दाखले.10.डॉक्टरांचे सर्टिफिकेट.

Post a Comment

Previous Post Next Post