कागलच्या नूतन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या जागी इंगळे काम पाहणार असल्याने प्रशासनावर वचक ठेवून लोकाभिमुख कामे करण्यावर भर देतील का ? याकडे तालुका वासियाचे लक्ष लागले आहे शिल्पा ठोकळे तीन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये महा राजस्व अभियान कोरोना महापूर भूत्खलन काळात केलेले विशेष कार्य कार्यालयात येणाऱ्या सामान्य माणसाची आपुलकीने विचारपूस करणारी एक लेडीज दबंग सिंघम तहसीलदार म्हणून संपूर्ण तालुक्याला परिचित होत्या प्रशासनावर ठेवलेला वचक यामुळे सामान्य माणसाला तहसीलदार म्हणजे हक्काचा माणूस वाटत होते त्यामुळे नव्या तहसीलदाराकडून सामान्य नागरिकांना चांगल्या प्रशासनाची अपेक्षा आहे कागल तालुक्यातील अनेक कार्यालयांमध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करताना शिकाऊ म्हणून पाठवले जाते त्यामुळे डोंगराळ वाड्यावस्त्यावरील भागात काम करताना अनेक कर्मचारी कर्तव्यात कसूर करतात प्रसंगी सर्वसामान्यांना वेळेत सुविधा उपलब्ध होत नाहीत प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो त्यामुळे तहसीलदार प्रशासन हाताळण्याचे आवाहन पेलणार का? असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे महसूल कृषी रेशन पुरवठा अभिलेख विभागात अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनावर ताण येतो वेळेत नागरिकांना सुविधा देता येत नाहीत पी एम किसान योजनेत अनेक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही महसूल व कृषी प्रशासनाच्या वादात शेतकरी दावणीला बांधला गेला आहे त्यामुळे यातील त्रुटी दूर करण्याचे सर्वात मोठे आव्हान प्रशासनावर असणार आहे राम लक्ष्मणाची जोडी तहसीलदार शिल्पा ठोकळे व मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री विकास बडवे या तडफदार अधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षाच्या काळात जनता भिमुख प्रशासन केल्याने सर्वसामान्यांना देखील त्यांचा कार्याचा हेवा वाटत होता त्यांचे हे कार्य चालू ठेवण्याची जबाबदारी नूतन तहसीलदार व पोलीस निरीक्षकावर असणार आहे.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी : यशवंत पाटील