इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी आणि आवश्यक व मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी विविध योजना तसेच उपक्रम राबविण्यात येत असतात त्याचबरोबर शासन स्तरावरून अनेक कल्याणकारी, लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. सदर उपक्रम, योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत काही कारणाने पोहोचत नसल्याने या योजनांचा लाभ त्यांना मिळत नाही त्यामुळे या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचव्यात याकरिता इचलकरंजी महानगरपालिकेचे नुतन आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी विविध ऑनलाईन माध्यमांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने फेसबुक - इचलकरंजी महानगरपालिका ट्विटर- lchalkaranji Municipal corporation @lchalkaranji MC इन्स्टाग्राम- ichalkaranji corporation आणि YouTube - Ichalkaranji Municipal corporation या इचलकरंजी महानगरपालिकेच्या वरील अधिकृत ऑनलाईन माध्यमांचा वापर करून इचलकरंजी महानगरपालिकेचे लोकोपयोगी उपक्रम,योजना त्याचबरोबर शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचव्यात आणि जास्तीत जास्त शहरवासीयांना या सर्व योजनांचा लाभ मिळावा याकरिता महानगरपालिकेच्यावतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आयुक्त दिवटी यांनी सांगितले आहे.
Tags
स्थानिक बातम्या