इचलकरंजी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज : कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या आयुक्त दिवटे यांच्या सूचन

 कोल्हापूर जिल्ह्यासह इचलकरंजी शहरात उद्भवलेल्या मागील काही वर्षातील महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार संभाव्य महापूर्व अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते संभाव्य महापूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नव्याने खरेदी केलेल्या फ्लोटिंग डॉकचे पूजन आयुक्त दिवटे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इचलकरंजी महापालिकेच्या आपत्कालीन विभागामार्फत पंचगंगा नदीघाट येथे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले त्याचबरोबर आपत्कालीन विभागाकडे उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीची सविस्तर माहिती आपत्कालीन विभागाचे संजय कांबळे यांनी प्रात्यक्षिकांसह दिली यामध्ये तांत्रिक बोट, साधी फायटर बोट, स्टील कटर, वुड कटर, लाईफ जॅकेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, लाइफ रिंग, दोर, मेगा फोन, ट्यूब, इमर्जन्सी लँम्प, टॉर्च, स्लाइडिंग शिडी, बायनाक्युलर इत्यादी साहित्य तसेच फायर बुलेट, फायर फायटर, रुग्णवाहिका हायड्रोलिक प्लॅटफॉर्म, औषध फवारणी ट्रॅक्टर, सक्शन ट्रॅक्टर यांचा समावेश आहे सर्व यंत्रसामग्री सुस्थितीत असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी घेत महापुराची परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी अचूक नियोजन करण्याच्या सूचना दिल्या यावेळी उपायुक्त तैमूर मुलाणी, सहाय्यक आयुक्त केतन गुजर, संजय बागडे, सुभाष देशपांडे, डॉ.सुनीलदत्त संगेवार, नितीन बनगे, बाजी कांबळे, सुनील बेलेकर यांच्यासह गणेश बरगाले, तेजोनिधी रेस्क्यू फोर्स, पोलीस बॉईज सदस्य, शाहीर जावळे, लक्ष्मी प्रोसेसची रुग्णवाहिका तसेच महापुराच्या काळात महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करणारे शहरातील पट्टीचे पोहणारे तसेच प्राणी मित्र उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post