मथुरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन
येथील दातार मळा परिसरात असलेल्या श्री.मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.जी.चव्हाण हे होते. प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका कु.ए.बी.जोंग यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. तसेच त्यांनी आपल्या मनोगतातून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचा आढावा घेतला. प्रशालेतील काही विद्यार्थ्यांनी देखील लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.एस.जी.चव्हाण यांनी महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साज-या करण्यामागचा उद्देश सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक शिक्षिका कु.व्ही.बी.चनवीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका कु.ए.पी.सिदनाळे यांनी केले.