भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा,गणेशोत्सव मंडप खुदाई शुल्क माफ करा- इनाम

भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त करा,गणेशोत्सव मंडप खुदाई शुल्क माफ करा- इनाम

आज, इचलकरंजी शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत महापालिका आयुक्तांना, इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने निवेदन देण्यात आले. शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून, इनाम ने केलेल्या पूर्वीच्या आंदोलनानंतर, नसबंदी मोहिम वाढवण्याचे व कोंडवाडा उभारण्याचे आश्वासन महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आले होते ते अद्यापही पूर्ण झाले नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. आतापर्यंत केवळ ९८४ कुत्र्यांचीच नसबंदी झाल्याचे नमूद करत,भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदारी महापालिकेवर राहील, असा इशारा देण्यात आला. तसेच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, शहरातील रस्त्यांची दुरवस्था तातडीने दूर करण्याबाबत व गणेश मंडप उभारणीसाठी घेतले जाणारे शुल्क या वर्षी माफ करण्याची विनंती करण्यात आली. गणेशोत्सव काळात महासत्ता चौक-थोरात चौक-आंबेडकर पुतळा रस्ता हा ८० फूट असून अतिक्रमणामुळे केवळ ३०-४० फूटच वापरात आहे. त्यामुळे झाडांची छाटणी, बंद पडलेली वाहने, अनधिकृत फुटपाथ हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी इनामचे अमित बियाणी, उमेश पाटील,नितीन ठिगळे,हरीश देवाडीगा,सचिन बाबर,राजू आरगे, राम आडकी,दीपक अग्रवाल,अमोल मोरे,जतीन पोतदार,महेंद्र जाधव,दीपक पंडित,राजू पारीक, अभिजीत पटवा आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post