सार्थक शिंदे यांचा चित्रपट ‘गारुड’ 25 ऑक्टोबरला होणार प्रदर्शित मराठी सिनेसृष्टीत नवा तारा!
7 ऑक्टोबर 2024 मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा तारा उदयाला येत आहे. सनशाइन स्टुडिओज प्रस्तुत आणि किमयागार फिल्म्स एल एल पी व ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट निर्मित गारुड हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2024 रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांनी केले आहे, ज्यांनी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात नाविन्य आणले आहे.सार्थक शिंदे, इचलकरंजीतील प्रसिद्ध उद्योजक सुहास शिंदे यांचे चिरंजीव असून, गारुड हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. सार्थक यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात केली आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी सार्थकच्या अभिनय क्षमतेबद्दल कौतुक करत सांगितले की, “सार्थक यांची भूमिका चित्रपटातील महत्त्वपूर्ण घटक असून, ती प्रेक्षकांच्या मनावर दीर्घकाळ टिकेल.”गारुड हा चित्रपट एकाच वेळी साहस, भावना आणि समाजिक संदेश देणारा आहे. प्रताप विठ्ठलराव सोनाळे यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटाची कथा मानवी जीवनातील संघर्ष आणि त्यातून बाहेर पडण्यासाठीच्या प्रयत्नांवर आधारित आहे. चित्रपटाच्या टीझरनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली असून, या चित्रपटाची अपेक्षा खूपच वाढली आहे.
सुहास शिंदे यांनी आपल्या मुलाच्या या पदार्पणाबद्दल अभिमान व्यक्त करत सांगितले की, “सार्थकने या चित्रपटासाठी खूप कष्ट घेतले आहेत. आम्ही त्याच्या यशासाठी खूप उत्सुक आहोत. सर्वांनी हा चित्रपट नक्कीच पहावा. प्रेक्षकांसाठी हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही, तर एक विचार प्रवर्तक अनुभव देणारा आहे. गारुड चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन निर्माते व दिग्दर्शकांनी केले आहे. तर, येत्या 25 ऑक्टोबरला गारुड आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा