इचलकरंजी शहरातील समस्यांवर महाविकास आघाडीची काँग्रेस कमिटीत संयुक्त बैठक.
इचलकरंजी शहर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस कमिटी कार्यालयात विविध शहरातील ज्वलंत विषयांवर आज विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरातील पायाभूत सुविधा, रस्त्यांची दुर्दशा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, तसेच नागरिकांच्या इतर समस्या यावर सखोल चर्चा करण्यात आली. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन महाविकास आघाडीने एकत्रितपणे जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.