"कर्करोगग्रस्त बालकाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांची कृतज्ञ भेट : वारीच्या काळात ‘विठ्ठल’ भेटल्याचा अनुभव"

"कर्करोगग्रस्त बालकाच्या उपचारासाठी मदत करणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफांची कृतज्ञ भेट : वारीच्या काळात ‘विठ्ठल’ भेटल्याचा अनुभव"

सोमवार, दि. २३ जून रोजी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे मिरज येथील एका कार्यक्रमानंतर मुंबईला जाण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवर आले होते. तेथे श्रीमहालक्ष्मी एक्सप्रेसची वाट पाहत असताना, त्यांची अचानक भेट झाली चिपरी (ता.शिरोळ) येथील श्री.उत्तम घोलप आणि त्यांचा मुलगा कु.आर्यन घोलप यांच्याशी. घोलप कुटुंबीयांनी भावूक होऊन मंत्री मुश्रीफ यांना मनापासून नमस्कार केला आणि गहिवरून त्यांनी सांगितले की, "साहेब, दहा वर्षांपूर्वी माझा मुलगा कॅन्सरने अत्यवस्थ होता. तुमच्या मदतीने आम्हाला मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात उपचार मिळाले. महागडे उपचार पूर्णतः मोफत झाले आणि आमच्या मुलाला जीवनदान मिळालं. आज तो पूर्णतः आरोग्यदायी आहे. या अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी भेटीमुळे मंत्री हसन मुश्रीफही भावविवश झाले. त्यांनी तत्काळ आर्यनची आई सौ.अर्पिता यांना व्हिडिओ कॉल केला. त्या क्षणी त्या अश्रूंना वाट मोकळी करत म्हणाल्या साहेब तुमच्यामुळेच माझ्या एकुलत्या एक मुलाचे श्वास चालू आहेत. वारीच्या काळात तुमच्याच रूपाने विठ्ठल भेटला. मी धन्य झाले. या क्षणांमुळे संपूर्ण वातावरणात एक विशेष पावित्र्य निर्माण झाले. मंत्री मुश्रीफ यांनीही त्यांना आश्वस्त करत सांगितले, कधीही कोणतीही अडचण आली, तर संकोच न करता भेटा. मी अहोरात्र तुमच्यासाठी उपलब्ध आहे. मी जनतेचा सेवक आहे.‌ही अनपेक्षित भेट केवळ कृतज्ञतेच्या भावनेपुरती मर्यादित न राहता, जीवनभर स्मरणात राहणारी आत्मिक भेट ठरली. या घटनेनंतर सोशल मीडियावर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माणुसकीने भरलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post