शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री हरीप्रिया महिला मंडळ, श्रीमंत शाहूनगर युवक मंडळ आणि रवी रजपुते सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समाजवादी प्रबोधिनी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १०० हून अधिक रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले. रक्तदात्यांना मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. याचवेळी नंदादीप नेत्रालयाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिरही घेण्यात आले, ज्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उद्घाटनप्रसंगी मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते, विलास मामा गाताडे, डॉ.कडतारे, गणेश जाधव, अरुणा माने, रोडे वहिनी व ठाणेकर वहिनी आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सर्वोत्तम दान म्हणजे रक्तदान’ हा सामाजिक संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्र. १२ मध्ये पोहोचवण्यात आला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी हरीप्रिया महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post