पन्हाळगडावरील गाईडने दाखवला प्रामाणिकपणा ; सापडलेल्या पर्ससह आडीच लाखाचा ऐवज केला परत
सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम चालू असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी होती यातील एका महिला पर्यटकाची पर्स तेथील निसार नगारजी या गाईड युवकाला सापडली होती ती त्याने त्यातील सुमारे आडीच लाखाचा ऐवजासह पोलिसांच्या समोर परत करत प्रामाणिकपणा दाखवला. पन्हाळगड नेहमीच पर्यटकांचे आकर्षण बनलेला आहे. त्यामुळे येथे तिन्हीही ऋतुत पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. त्यातच मे महिना म्हणजे उन्हाळी सुट्टीचा जणू हंगामच. मग केवळ शनिवारी रविवारच्या सुट्टीचीच वाट कोण बघणार. त्यामुळे शुक्रवार असूनही पन्हाळगड पर्यटकांनी गजबला होता.यात युवकांच्या बरोबरच मोठ्या संख्येने काटुंबासमवेत येणाऱ्या पर्यटकांची संख्याही लक्षानीय होती. अशेच एक कुटूंब तबक उद्यान परिसरात फिरत होते. तेव्हा त्या कुटूंबातील महिलेची पर्स या परिसरात पडली. याची त्या महिलेला जाणीव नव्हती. तेव्हा त्याच परिसरात निसार नगारजी हा एका पर्यटक कुटुंबाला घेऊन गेला. तेव्हा त्याला तिथे पडलेली काळ्या रंगाची पर्स सापडली. ती त्याने तात्काळ उचलली व थेट तिथे गस्तीसाठी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिली. व सोबतच्या पर्यटकांना वाघदरवाज्याची माहिती सांगू लागला. तेव्हा तेथे पर्स गहाळ झालेली महिला घाबरलेल्या स्थितीत आली. तेव्हा निसारने तीच्याकडे चौकशी केली असता तीने पर्स पडलेचे सांगितले. निसारने तिला धीर देत सरळ पन्हाळा पोलीस ठाण्यात आणले. व सापडलेली पर्स त्यांची असलेचे पोलिसांना सांगितले. त्यानंरत पोलिसांनी पर्सची ओळख पटवून पर्स महिलेच्या स्वधीन केली. त्या पर्स मध्ये दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व ८० हजार रुपये रोख रक्कम असा आडीच लाखाचा ऐवज होता. पण निसार नगारजी याने लोभ टाळत पर्स परत करून प्रामाणिकपणा दाखला. निसार च्या या प्रामाणिकपणाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.