महाशिवरात्र निमित्त गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टतर्फे महामृत्युंजय हवनाचे आयोजन

महाशिवरात्र निमित्त गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टतर्फे महामृत्युंजय हवनाचे आयोजन

महाशिवरात्री निमित्त गोसंवर्धनी अग्निहोत्र ट्रस्टच्या वतीने मोहनलीला गोशाळा, तीन बत्ती चार रस्ता, श्रीरामनगर येथे बुधवार, २६ फेब्रुवारी रोजी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत महामृत्युंजय हवनाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या पवित्र हवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.दरवर्षी महाशिवरात्र विशेष भक्तीभावाने साजरी करण्यासाठी ट्रस्टतर्फे या हवनाचे आयोजन केले जाते. यंदाही हा धार्मिक सोहळा भक्तिभावाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामृत्युंजय मंत्राचा जप आणि हवन केल्याने मानसिक आणि वातावरणीय शुद्धी होते, तसेच भक्तांच्या आरोग्य व कल्याणासाठी हा यज्ञ अत्यंत फलदायी मानला जातो.भगवान शंकराला रुद्राक्ष, बेलपत्र, भस्म, नृत्य व संगीत प्रिय आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून रुद्राक्ष वातशामक, बेलपत्र रक्ताभिसरण सुधारणारे आणि भस्म शरीरशुद्धी करणारे असते. अग्नी उपासना व यज्ञाने भगवान शिव प्रसन्न होतात, अशी श्रद्धा आहे. गेल्या ३२ वर्षांपासून ट्रस्ट हा यज्ञ श्रद्धेने आणि शिस्तबद्ध रीतीने पार पाडत आहे. या निमित्ताने उपस्थित भाविकांना अग्निहोत्र यज्ञाचे महत्त्व व त्याच्या नित्य साधनेची माहिती दिली जाईल. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र हवनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post