नरसू शिंदे सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय समाजसेवक पुरस्काराने सन्मानित
पोश्रारातवाडी येथील समाजसेवक नरसू शिंदे यांना सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्यावतीने सह्याद्री संविधानिक राष्ट्रीय समाजसेवक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. नरसू शिंदे हे गेली अनेक वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असून त्यांनी आजरा तालुक्यातील हजारोच्यावर महिलांना गावरान कुकुट पालन व्यवसाय घालून दिलेला आहे व त्यांनी आतापर्यंत 5000 हजाराच्यावर विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र बाल गुन्हेगारी कमी होण्यासाठी जनजागृती केली आहे तर डोंबारी भिक्षुक लोकांच्या मुलासाठी रात्रशाळा घेतली आहे. तर ऊसतोड मजूर कामगार मुलांना हजाराच्या वर अंकलपी वाटप केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत. सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मॅनेजमेंट यांच्यावतीने सांगली वनक्षेत्र अधिकारी सर्जेराव सोनवडेकर, मंगलमुखी किन्नर चॅरिटेबल ट्रस्ट,पुणे संस्थापक अध्यक्षा रंजिता नायक, प्रसिद्ध वक्ता तोहीद मुजावर, सांगली मोटर वाहन निरीक्षक आकाश कालिंदे, माजी मुख्याध्यापक मनोहर पवार, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, कास्ट्राईब शिक्षक संघटना सांगली अध्यक्ष संतोष कदम, महिला व बालकल्याण हक्क संरक्षण आयोग महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार ॲड.डाॅ.तुषाल शिवशरण व संस्थापक अध्यक्ष गणेश वाईकर यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील यड्रावकर नाट्यगृहामध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.