इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे प्रजासत्ताकदिन साजरा; संविधान रक्षणाचे डॉ.विलास खिलारे यांचे आवाहन

इचलकरंजी शहर काँग्रेसतर्फे प्रजासत्ताकदिन साजरा; संविधान रक्षणाचे डॉ.विलास खिलारे यांचे आवाहन

इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 75 व्या वर्धापनदिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ध्वजारोहणाचा मान डॉ.विलास खिलारे यांना देण्यात आला. यावेळी डॉ.खिलारे यांनी मनोगत व्यक्त करत भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास शशांक बावचकर, संजय कांबळे, राहुल खंजिरे, विठ्ठलराव डाके, रेहमान खलीफा, बाबासो कोतवाल, प्रमोद खुडे, युवराज शिंगाडे, बिस्मील्ला गैबान, अनिता बिडकर, अजित मिणेकर, किशोर जोशी, रवि वासुदेव, वेदिका कळंत्रे, विद्या भोपळे, यास्मीन मुजावर, सुकुमार चौगुले, सचिन साठे, शिवा चव्हाण, प्रमोद मुसळे, रियांज चिक्कोडे, रमजान शिकलगार, गोविंदा आडाव, योगेश पंजवानी, योगेश कांबळे, कुणाल भोसले, अल्ताफ मुजावर यांसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post