मथुरा हायस्कूलची विद्यार्थिनी कु.कार्तिकी बंडगर हिचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक
श्री भावेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट, इचलकरंजी, महानगरपालिका व कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये मथुरा हायस्कूल, इचलकरंजीची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी कु.कार्तिकी बंडगर हिने तृतीय क्रमांक पटकावला. स्पधेॅत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल संयोजकांच्यावतीने तिचा शील्ड, प्रमाणपत्र व रोख ₹501 रूपये देऊन सन्मान करण्यात आला.तिच्या या यशाबद्दल श्री मथुरा शिक्षण संस्थेचे कार्यवाह विवेक शेळके तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. कार्तिकीला प्रशालेचे मुख्याध्यापक एस.जी. चव्हाण यांची प्रेरणा व मराठी विभागप्रमुख वाय.एन.कोथळे सर यांचे मार्गदर्शन लाभले.