पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासासाठी तत्पर राहील – आमदार डॉ.राहूल आवाडे

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी व विकासासाठी तत्पर राहील – आमदार डॉ.राहूल आवाडे

"पत्रकार दिन व पुरस्कार गौरव दिन" या कार्यक्रमात आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी पत्रकारांबरोबर हातात हात घालून काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. व्हॉईस ऑफ मीडियाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना त्यांनी पत्रकारांच्या कल्याणासाठी विविध योजना आणि संरक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रम क्रेडाई इचलकरंजी, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि द पॉवरलूम असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. पत्रकारांच्या योगदानाचा गौरव करताना डॉ. आवाडे यांनी सांगितले की, "पत्रकारांना योग्य प्रतिष्ठा आणि संरक्षण मिळावे, यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन."कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले, तर उपाध्यक्ष रविकिरण चौगुले यांनी आभार मानले. या वेळी पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, आणि इचलकरंजीतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post