माहेश्वरी सभा नवदिशा अधिवेशन संपन्न

माहेश्वरी सभा नवदिशा अधिवेशन संपन्न 

महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या  संभाजीनगर जिल्हा माहेश्वरी सभेच्या आतिथ्य ने ११ व १२ जानेवारी रोजी नवदिशा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. या अधिवेशनात कौतुकास्पद व सराहनीय "बिझनेस कन्क्लेव" कार्यक्रम झाला, ज्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञ ८ वक्त्यांचे ज्ञानवर्धक सेमिनार झाले. विशेषतः हितेषजी पोरवाल, सीए अनिषजी माहेश्वरी व दिनेशजी सोमानी यांच्या उद्बोधनाचा उल्लेखनीय परिणाम दिसून आला. ११ जानेवारीच्या सायंकाळी महाराष्ट्र प्रदेश सभे मार्फत राज्यस्तरीय सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माहेश्वरी समाजाच्या संस्थांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातून माहेश्वरी युथ फाउंडेशन, इचलकरंजी यांना त्यांच्या सराहनीय कार्यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सतीशजी डाळ्या, डॉ.लक्ष्मीकांतजी तोष्णीवाल, श्यामसुंदरजी मर्दा, अरुण बांगड, दीपक राठी, वासुदेव तोतला, व श्रीनिवास डाळ्या यांना अखिल भारतीय माहेश्वरी सभेचे कोषाध्यक्ष राजकुमार कालिया व उपाध्यक्ष अरुणजी भागंडिया यांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आला. १२ जानेवारी रोजी प्रदेश कार्यकारिणीची सभा पार पडली, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील ४०० कार्यकारिणी सदस्य सहभागी झाले होते. या सभेत समाज सुधारणा व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांच्या उन्नतीसाठी कार्ययोजना तैयार करण्यात आली, तसेच संविधानाशी संबंधित प्रस्ताव पारित करण्यात आले. प्रदेश सभेचे अध्यक्ष मधुसूदनजी गांधी व मंत्री सत्यनारायणजी सारडा यांनी प्रभावीपणे सभा मार्गदर्शित व संचालित केली. संभाजीनगर जिल्हा सभेचे अध्यक्ष श्यामसुंदरजी सोमानी व सचिव अजीतजी नावंदर यांनी निवास, भोजन, मंडप व वाहतूक व्यवस्थेची सुंदर व सराहनीय मांडणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष नितीन धूत यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सचिव लालचंद गट्टाणी यांच्या नियोजनाखाली भिकुलाल मर्दा, श्रीकांत मंत्री, घनश्याम इनाणी, विनीत तोष्णीवाल, मुकेश खाबाणी, वासुदेव बांगड, रामगोपाल मालाणी,श्यामसुदंर मर्दा, बालकिशन टुवाणी, मोहनलाल चाडंक, संजय सारडा, दिलीप बजाज, मनीष झंवर व संजय तोतला,गजाधर मांधनिया यांनी या अधिवेशनात भाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post