प्रा.सचिन बेलेकर यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

प्रा.सचिन बेलेकर यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान

“बी द चेंज फाउंडेशन” शिर्डी यांच्या वतीने दिनांक 29 जून 2025 रोजी प्रा.सचिन बेलेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा मानाचा पुरस्कार त्यांना देण्यात आला. प्रा.बेलेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध नवनवीन उपक्रम राबवत शिक्षण क्षेत्रात ठसा उमटवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी यशस्वी झाले असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आहे. सध्या ते चैतन्य पब्लिक स्कूल येथे कार्यरत असून, विद्यार्थ्यांमध्ये नवे विचार, सृजनशीलता व प्रेरणा निर्माण करण्याचे कार्य ते करत आहेत. या पुरस्काराचे वितरण शिर्डी येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पद्मश्री पोपटराव पवार यांचे चिरंजीव प्रसन्न पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा.गणेश कांबळे, स्वरूप कापे, पतसंस्था महासंघाचे अध्यक्ष ओम प्रकाश कोयटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रा.सचिन बेलेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांना व सहकाऱ्यांना दिले असून, हा पुरस्कार त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरल्याचे नमूद केले. त्यांच्या कार्यामुळे शाळेचे नाव उज्वल झाले असून, अशा शिक्षकांचा सन्मान करत फाउंडेशनने एक प्रेरणादायी पाऊल उचलल्याचे उपस्थितांनी सांगितले. हा पुरस्कार इतर शिक्षकांनाही प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post