महाराष्ट्र विधानसभा निवडणुकिचे बिगुल वाजले ; दिवाळीनंतर राजकीय फटाके फुटणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज मंगळवार दि.15/10/2024 रोजी दुपारी 3:30 वाजता जाहीर झाली आहे.२० नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे.२३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला असून निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख 22 ऑक्टोंबर 2024 उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोंबर २०२४, उमेदवारी अर्जांची छाननी ३० ऑक्टोंबर २०२४, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत ४ नोव्हेंबर २०२४, मतदान २० नोव्हेंबर २०२४, मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर राजकीय फटाके फूटणार आहेत.