अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश पक्षाने सोपविली स्टार प्रचारकपदाची जबाबदारी

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवार गटामध्ये प्रवेश पक्षाने सोपविली स्टार प्रचारकपदाची जबाबदारी 


अभिनेते सयाजी शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ व सुनील तटकरे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. येत्या विधानसभा निवडणुकीत ते पक्षाचे स्टार प्रचारक असतील, अशी घोषणा अजित पवार यांनी यावेळी केली.पक्षाची धोरणे आवडल्याने राष्ट्रवादीत येण्याचा निर्णय घेतला, असे सयाजी यांनी सांगितले. याप्रसंगी अजित पवार म्हणाले, सयाजी यांनी अनेक सामाजिक उपक्रमांचे नेतृत्व केले आहे. त्यांना झाडांची अतिशय आवड आहे. आपले डोंगर उजाड होत चालले आहेत. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून वृक्षारोपणाचे काम ते करतात. त्यांना विधानसभेत पक्षाच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवली जाईल. पक्षात त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल असे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post