विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड

विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी मधुकर मुसळे (बापू) यांची निवड 


कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या सदस्यपदी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मधुकर मुसळे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीसाठी खासदार धैर्यशील माने यांचे योगदान लाभले. मधुकर मुसळे हे विविध संस्था, सामाजिक कार्य, उद्योग व्यवसाय अशा क्षेत्रात कार्यरत असून श्री मुसळे हे माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने व खासदार धैर्यशील माने यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जातात. त्यांनी २० वर्षांपासून विविध सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला असून राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला होता. तसेच इचलकरंजीतील न्याय संकुलसाठी श्री.मधुकर मुसळे यांचे विशेष प्रयत्न लाभले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post