केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर 


केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय नेते अमित शहा बुधवारी २५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहा यांच्या दौऱ्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. या दौऱ्यात ते पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा करणार आहेत. अमित शहा बुधवारी दुपारी अडीच वाजता नाशिक विमानतळावरून विमानाने कोल्हरपूरकडे प्रयाण करणार आहेत. दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी कोल्हापूर विमानतळावर आगमन होणार आहे. चार वाजता श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन परत विमानतळाकडे रवाना होणार आहेत. दुपारी साडेचार वाजता विमानतळावर पश्चिम महाराष्ट्रातील भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. सहा वाजून पाच मिनिटांनी विमानाने दिल्लीकडे रवाना होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post