महात्मा बसवेश्वर महाराजांचे स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्त्वत मंजुरी ; जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची माहिती
इचलकरंजी मतदारसंघातील महानगरपालिका हद्दीमध्ये लिंगायत समाज मोठ्या संख्येने असून जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज स्मारक उभारणी करिता स्मारकाला मान्यता देऊन सदर स्मारकाकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी लिंगायत समाज बांधवांनी जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्याकडे केली होती. त्यानुसार या मागणीचा पाठपुरावा रविंद्र माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केला होता. शनिवारी मुंबईत माने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या मागणीला प्रतिसाद देत जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यास तत्वतः मंजुरी दिली.