केंद्रीय गृह समितीच्या सदस्यपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड
केंद्रीय शिवसेना पक्षाचे उपनेते व खासदार धैर्यशील माने यांची देशाच्या केंद्रीय गृह समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्यावतीने २०२४-२५ साठी २४ संसदीय स्थायी समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. भाजपच्या प्रमुख मित्र पक्षांव्यतिरिक्त महाराष्ट्रातील त्यांचे मित्र पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना प्रत्येकी एक समितीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील माने यांना केंद्रीय गृह समिती सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. याबद्दल खासदार धैर्यशील माने यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले आहेत.