क्रेडाई इचलकरंजी नूतन कार्यालयाचे व सौ.सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

क्रेडाई इचलकरंजी नूतन कार्यालयाचे व सौ.सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे रविवारी विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन 


क्रेडाई इचलकरंजीच्या नूतन कार्यालयाचे व सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचा उद्घाटन समारंभ येत्या रविवारी होत आहे. क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार यांच्या हस्ते व खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर व इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होत आहे. ही माहिती क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा, उपाध्यक्ष रणजीत लायकर जहीर सौदागर व सेक्रेटरी सम्मेद मगदूम यांनी दिली. क्रेडाई इचलकरंजी ही गेली अनेक वर्षे इचलकरंजी शहरात बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्र आणून विविध पातळीवर कार्यरत संघटना आहे. देशव्यापी संघटनेचे येथील शाखा स्थापनेनंतर क्रेडाई इचलकरंजीच्या माध्यमातून अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम त्याचबरोबर व्यावसायिकांना आवश्यक असणारे विविध व्याख्याने, परिसंवाद, प्रशिक्षण तसेच कामगारांच्यासाठी नोंदणीच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या गेल्या. संघटनेच्या स्थापनेमुळे येथील बांधकाम व्यवसायाला एक विशिष्ट दर्जा ही प्राप्त झाला. क्रेडाई इचलकरंजीचे संस्थापक अध्यक्ष नितीन धूत, सय्यद गफारी, मयूर शहा यांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने नेत्रदीपक कामगिरी करत राज्यात आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. क्रेडाई इचलकरंजीचे स्वतंत्र कार्यालय असावे असा संकल्प गेली अनेक वर्षे होता. ही संकल्पना आता साकारत आहे. सुमारे बाराशे चौरसफूट वास्तूमध्ये ... कार्यालय साकारले आहे. संस्थेच्या सभागृहास सौ सरस्वती रामकिशोर धूत सभागृह असे नाव देण्यात आले आहे . संस्थेच्या या नव्या कार्यालयाचा फायदा आता या पुढील काळात विविध परिसंवाद, प्रशिक्षण त्याचबरोबर कामगारांच्यासाठी विविध योजना राबवण्यासाठी होणार आहे. तसेच बांधकाम व्यवसायिकासाठी आवश्यक असणाऱ्या दस्त नोंदणीची सुविधा व रेरा नोंदणीची ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्याचा लाभ बांधकाम व्यावसायिक त्याचबरोबर बांधकाम क्षेत्रातील विविध घटकांना होणार आहे.येत्या रविवारी सकाळी 11 वाजता सांगली रोडवरील माणिक एम्पायर या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी क्रेडाई संस्थेचे ट्रेझर प्रीतेश शहा, पिरगोंडा (राजू) पाटील, मोहित गांधी, फिरोज शिकलगार, विजय गलगले,साजिद बेडकाळे, शिवकुमार हिराणी, विरेन शहा, शुभम शर्मा, यशवंत राठोड,चंद्रकांत भागाजे, तानाजी हाराळे, अशोक सालेचा, अरिंजय पाटील, विक्रमसिंह राठौड़, कैश बागवान, सौरभ जाधव, अनिल निकम यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post