शहापूर खण,सीसीटीव्हीसाठी आठ कोटीचा निधीरा ; राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडेंची माहिती

शहापूर खण,सीसीटीव्हीसाठी आठ कोटीचा निधीरा ; राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडेंची माहिती


शहापूर खण येथे सर्व सुविधांनीयुक्त पर्यटनस्थळ निर्माण करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंजूर केला आहे. या निधीतून खणीचे रुपडे पालटणार आहे. त्याचबरोबर शहरातील महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून संरक्षणाची काळजी घेण्यासाठी सव्वा कोटी रुपये तर मोबाईल टॉयलेटसाठी २ कोटी रुपये असा तब्बल ८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी नामदार मुश्रीफ यांनी महानगरपालिकेस उपलब्ध करून दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इचलकरंजी शहर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी दिली.चोपडे म्हणाले, विविध विकासकामांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी नामदार मुश्रीफ यांच्याकडे केली होती. इचलकरंजी हे मोठ्या लोकसंख्येचे आणि महानगपालिका असलेले शहर असले तरी पर्यटनाच्या दृष्टीने खूप मर्यादित सुविधा शहरात आहेत. नागरिकांना विरंगुळ्यासाठी एक चांगले ठिकाण निर्माण व्हावे यासाठी शहापूर खणीवर सुविधा निर्माण करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार नामदार मुश्रीफ यांनी खणीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याठिकाणी चांगले पर्यटनस्थळ विकसित होऊ शकेल, त्यासाठी ५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार नामदार मुश्रीफ यांनी पर्यटनस्थळासाठी निधी मंजूर केला आहे. शहरातील महानगरपालिका मालकीच्या शाळा इमारतीमध्ये शाळा सुटल्यानंतर वेगवेगळ्या पध्दतीच्या चुकीच्या गोष्टी घडतात. त्यामुळे सर्व शाळांचा परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत आणण्यासाठी १.२५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली आहे. याशिवाय इचलकरंजी शहरांमध्ये अत्याधुनिक पध्दतीचे मोबाईल टॉयलेटसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मागणीनुसार नामदार मुश्रीफ यांनी इचलकरंजी शहरासाठी दिलेल्या या अतिरिक्त निधीमुळे शहापूर खणीच्या विकासासह शहरातील महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार आहेत, असेही चोपडे यांनी सांगितले. दरम्यान, सीईटीपी संदर्भात शहरातील सायझिंग धारकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याची माहिती चोपडे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post