राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन


भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी सोमवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीला कुंकुमार्चन अभिषेक करुन विधिवत पूजा केली. तसेच एकारती, पंचारती व कर्पूरआरती करुन देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची कन्या इतिश्री मुर्मू व भाऊ तारिणीसेन टुडू यांनीही देवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन्, केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक आयुक्त समीर मुजावर, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, पोलिस उपअधिक्षक प्रिया पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी आदी उपस्थित होते.सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन् यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दर्शनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून श्री अंबाबाई देवीच्या मंदिराविषयी माहिती जाणून घेतली तसेच मंदिरातील दगडी झुंबर व शिल्पकलेची पाहणी केली. देवीच्या किरणोत्सवाची माहिती जिल्हाधिकारी येडगे यांनी त्यांना दिली. देवीचे दर्शन झाल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाधान व्यक्त केले.

Post a Comment

Previous Post Next Post