मा.श्री.सुरेशदादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 मा.श्री.सुरेशदादा पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा 


मराठा समाजाचे नेते, महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष व मेट्रो हायटेक टेक्स्टाईल पार्कचे सर्वेसर्वा मा.श्री.सुरेशदादा पाटील यांचा वाढदिवस पारंपरिक पद्धतीला फाटा देत वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. दादांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन सामाजिक बांधिलकी व पर्यावरण संवर्धन या उद्देशाने टेक्स स्टाईल पार्क मदिल सर्व कर्मचाऱ्याना फळ झाडे भेट करण्यात आली. तसेच पार्कमध्ये नवीन झाडे वृक्षरोपण करण्यात आली. तर कामगारांना काम करते वेळी सुरक्षितता व सुसूत्रता वाटावी यासाठी ऍप्रॉनचे वाटप, सेक्युरिटी गार्डना रेनकोट वाटप मेट्रो हायटेक को-ऑपरेटीव्ह टेक्स्टाईल पार्कचे विद्यमान अध्यक्ष व स्टार्ट अप इंडियाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भरतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मेट्रो हायटेक को-ऑपरेटीव्ह टेक्स्टाईल पार्कचे सी.ई.ओ. सुहासदादा पाटील व जनरल मॅनेजर श्री संजय जिमगे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post