शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांना कर्नाटकातून उच्चांकी मतदान देणार ; सहकाररत्न उत्तम पाटील बोरगांवकर

शिरोळच्या दत्त साखर कारखान्याच्या निवडणुकीत गणपतराव पाटील यांना कर्नाटकातून उच्चांकी मतदान देणार ; सहकाररत्न उत्तम पाटील बोरगांवकर 


शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्री दत्त सहकारी साखर कारखाना हा स्वर्गीय माजी आमदार सा.रे.पाटील व विद्यमान चेअरमन गणपतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण कारखाना परिसर व कर्नाटक ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. तसेच कर्नाटक मधील सभासद शेतकऱ्यांच्या अडचणीला नेहमीच हा कारखाना हातभार लावलेला आहे. त्या कारण येणाऱ्या काळात शेतकरी सभासदांनी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व उद्यान पंडित गणपतराव पाटील यांच्या दत्त विकास पॅनलच्या बाजूने राहून सर्व उमेदवारांना उच्चांकी मतदान करून निवडून आणण्यासाठी उपस्थीत शेतकरी सभासद यांना आवाहन केले. पुढे बोलताना उत्तम पाटील म्हणाले की उद्यान पंडित गणपतराव पाटील यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कारखाना चालवलेला आहे, तसेच तज्ञ संचालक मंडळ यांनी देखील स्वच्छ व पारदर्शक कारभार करून कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येणाऱ्या काळात आम्ही कर्नाटक येथील सर्व ऊस उत्पादक सभासद व बिगर सभासद यांनी गणपतराव पाटील यांच्या दत विकास पॅनलला भरघोस मतांनी निवडून आणून देण्याचे अभिवचन सभासदांच्या वतीने उत्तम पाटील यांनी दिले. यावेळी दत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक इंद्रजीत पाटील, संचालक अरुण देसाई, बोरगावचे नगरसेवक अभय मगदूम व उपस्थित मान्यवरांनी गणपतराव पाटील यांच्या बाजूने आपण सर्वांनी उभे राहून त्यांना पुन्हा एकदा चेअरमन करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमासाठी चेअरमन अरुण देसाई, सिदगोंदा पाटील, जयपाल नागावे, अरिहंतचे जनरल मॅनेजर अशोक बँकापुरे, पिरगोंडा पाटील, राजू मगदूम, मनोज पाटील, अभय करोले  भुजगोंडा पाटील, धन्यकुमार पाटील, राजेंद्र फिरगान, नगरसेवक प्रदीप माळी, माजी ग्रामपंचायत माजी अध्यक्ष बाबासो वटारे, जयपाल हवले, आप्पासाहेब पाटील, बाबासाहेब निकम, अशोक पाटील यांच्यासह बोरगाव सह परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक अभय मगदूम यांनी केले तर  शरदचंद्र पाठक यांनी आभार मानले. 

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे.

Post a Comment

Previous Post Next Post