श्री लक्ष्मी विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न

श्री लक्ष्मी विद्यालयात पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न 


कागल तालुक्यातील हसूर खुर्द येथील श्री लक्ष्मी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे शनिवार दि. 20 जुलै रोजी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या निकालानंतर वर्षभरामध्ये विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य पात्र विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विद्यालयात दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम आलेल्या कु.समीक्षा रामचंद्र जाधव हिला 11 विविध पुरस्काराने, द्वितीय क्रमांक प्राप्त कु.सिद्धी सचिन सावंत हीला विविध 9 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यालयातील एकूण 50 विद्यार्थ्यांना विविध 27 प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालकांच्यावतीने इयत्ता 5वी व 8वी स्कॉलरशिप/एन.एम.एम.एस तसेच इयत्ता दहावी 100% निकाल लागल्याबद्दल मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री.बी.एल.पाटोळे सर होते. त्यांनी आपल्या मनोगतात सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तसेच दीपावली सुट्टीमध्ये स्वतःबुद्धिबळ व रुबी क्यूब याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे जाहीर केले. श्री.टी.एस.गडकरी सर यांनी आपल्या मनोगतातून भारताचा आदर्श नागरिक घडण्यासाठी विद्यालयातून आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो त्याच्या विषयी माहिती दिली. हसुर खुर्दचे सरपंच श्री.सुभाष गडकरी, श्री.एन.डी.मुदाळकर सर, श्री.विश्वनाथ चावरे सर यांनी मनोगते व्यक्त केली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.बी.डी.पाटील सर यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन श्री. एस.आर.पाटील व श्री.एस.एस.मांगले यांनी तर आभार प्रदर्शन श्री.एन.एन.बालेखान यांनी केले. याप्रसंगी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.एस.जी.भिलगुडे सर, बेलेवाडी काळम्माचे श्री.बी.वाय.पाटील सर, हसूर बुद्रुक चे उपसरपंच श्री.पुरुषोत्तम साळोखे, कासारीचे श्री.धनाजी काटे गुरुजी, विद्यालयाचे आजी-माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील

Post a Comment

Previous Post Next Post