खडकलाट पोलिसांनी शिरगांव येथील मोबाईल दुकानातील चोरीचा लावला छडा ; चोरांकडून १ लाख ५७ हजारांचे साहित्य जप्त

खडकलाट पोलिसांनी शिरगांव येथील मोबाईल दुकानातील चोरीचा लावला छडा ; चोरांकडून १ लाख ५७ हजारांचे साहित्य जप्त 


कोडी तालुक्यातील शिरगाव येथे मे महिन्यात झालेल्या बस स्थानक जवळील स्वराज मोबाईल दुकानाचे दार व कुलुप मोडून दुकानातील मोबाईल हॅंडसेट, एअरबर्डस, नेक बॅंड, स्मार्ट वॉच, स्पिकर असे एकुण १ लाख ३८ हजार ७०० रू किंमतीचे साहित्य अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याची फिर्याद सुधाकर प्रकाश कुरणे रा‌.शिरगांव (ता.चिक्कोडी) यांनी दिली होती. त्यानुसार या घटनेची नोंद खडकलाट पोलीस स्टेशनमध्ये झाली होती. या प्रकरणाच्या संदर्भात जिल्हा पोलिस प्रमुख भिमा शंकर गुळेद, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख आर.बी.बसर्गी, चिक्कोडीचे डि.वाय.एस्. पी.जी.बी.गौडर यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणी सर्कल पोलिस उपनिरीक्षक बी.एस्‌.तळवार यांच्या नेतृत्वाखाली निपाणी बसवेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तसेच प्रभारी पोलिस उपनिरीक्षक डि.बी.कोतवाल, ए.एस.आय. एस.सी.अंबरशेट्टी आणि पोलिस कर्मचारी जे.एन्.नायक, डी.आर.पुजारी, व्ही.एम्.संभाजी यांच्या टिमने बेळगांव टेक्निकल सेल विनोद ठक्कण्णवर यांच्या सहकार्याने अचुक माहीतीच्या आधारे शनिवार दि.20 जुलै रोजी सकाळी 11 वा. दोन आरोपींना अटक केरून त्यांच्या ताब्यात असलेले व या प्रकरणातील चोरी झालेले 1 लाख 22 हजार रूपये किंमतीचे 25 मोबाईल हॅंडसेट व चोरीसाठी वापरण्यात आलेले 35 हजार रूपये किंमतीची 1 मोटरसायकल असे एकुण 1 लाख 57 हजार किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.  तसेच ताब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल पोलिस उपनिरीक्षक डि.बी.कोतवाल व सहकारी पोलिसांच्या टिमचे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.  

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगांवहुन अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post