डॉजबॉल स्पर्धेत स्वीकार हारगुले याला गोल्ड मेडल
हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या 16 वर्षाच्या आतील नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिप 2024 या स्पर्धेमध्ये मिक्स मॅच या प्रकारात महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना प्रथम क्रमांकाचे शिल्ड व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा खेळाडू स्विकार रणजीत हरगुले (राहणार -अब्दुल लाट) याला गोल्ड मेडल देऊन हिमाचल प्रदेश डॉजबॉल असोसिएशन, हिमाचल यांच्यावतीने गौरविण्यात आले. भरपूर सराव जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वीकार हरगुले याने सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय डॉजबॉल संघाचे प्रतिनिधित्व केले होते. याच जोरावर तो आज महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघामार्फत खेळत असून आपल्या आक्रमक खेळीने तो गोल्ड मेडल प्राप्त करण्यात यशस्वी झाला असून त्याने केलेल्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच्या अब्दुल लाट गावासह जिल्ह्यातून व संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यासाठी स्विकारला कोच पवन धनकर सर, महाराष्ट्र डॉजबॉल असोसिएशनचे महासचिव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉ.हनुमंत लुंगे सर, क्रीडा शिक्षक सुहास कुलकर्णी सर यांच्यासह गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक गणेश नायकुडे सर यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.