इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन 


इचलकरंजी महानगरपालिकेच्यावतीने गुरुवार दि.१८ जुलै रोजी साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे  यांच्या स्मृतिदिना निमित्त किसनराव आवळे मैदान येथील त्यांच्या पुतळ्यास अति.आयुक्त प्रसाद काटकर  यांच्या हस्ते आणि उपायुक्त सोमनाथ आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक अब्राहम आवळे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, शहर अभियंता महेंद्र क्षिरसागर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, सदाशिव शिंदे, सुभाष आवळे, अविनाश रंगाटे, दिलीप मगदूम, महेश बुचडे, सचिन शेडबाळे, गणेश पुजारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post