बेलेवाडी काळम्मा येथे लाडकी बहीण शिबिरास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद

बेलेवाडी काळम्मा येथे लाडकी बहीण शिबिरास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद 


सर्वत्र सध्या एका योजनेची चर्चा आहे गल्लीबोळात रस्तो-रस्ते गावोगावी व शहरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गावोगावी ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याची सर्व राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून बेलेवाडी काळम्मा येथे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने ग्रामपंचायत बेलेवाडी काळम्मा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म व नवीन मतदार नोंदणी करणे या शिबिराचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या शिबिरास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी होऊन गावातील महिलांना याचा लाभ मिळावा म्हणून गावात ऑनलाईन अर्ज तसेच नवीन मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते लाभार्थी महिलांनी या शिबिरातून नोंदणी करत योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसपार्टी बेलेवाडी काळम्मा यांनी केले आहे. योजनेमध्ये कागदपत्राच्या अटी शिथील करून योजनेची नोंदणी सोपी केली आहे. शिबिरामध्ये कागदपत्रे तपासून ऑनलाईन फॉर्म जमा करून घेतले जात आहेत ज्या महिलाकडे बँक खाते नाही अशा महिलांना जागेवरच पोस्ट खाते सुरू करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलेने शिबिराचा लाभ घ्यावा तसेच नव मतदारांनी मतदान नोंदणी करावी असेही आव्हान आयोजकांनी केले आहे यावेळी तंटामुक्तीचे अध्यक्ष शशिकांत देसाई, सागर पाटील, पांडुरंग पाटील, सुनील पाटील, विनोद सुतार, बाळू पाटील, अर्जून पाटील, दिवाकर पाटील, विकी मल्होत्रा, पांडुरंग शिंदे आदिंसह गावातील ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. योजनेचे अर्ज मोबाईल वरून भरण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. पण डिजिटल इंडियात आजही ग्रामीण भागात मोबाईल आणि इंटरनेट नेटवर्कसाठी धडपड करावी लागत आहे. अँपचे सर्वर डाऊन आणि इंटरनेटची रेंज नसल्याने अनेक महिलांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाने सरसकट ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारावा अशी मागणी महिला वर्गातून होऊ लागली आहे.

वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील

Post a Comment

Previous Post Next Post