रयत सोशल फौंडेशन व नारायणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इचलकरंजी यांचे वतीने मोफत मार्गदर्शन शिबीरास सुरुवात

रयत सोशल फौंडेशन व नारायणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इचलकरंजी यांचे वतीने मोफत मार्गदर्शन शिबीरास सुरुवात 


रयत सोशल फौंडेशन व नारायणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इचलकरंजी यांचे वतीने " एक पाऊल नशामुक्तीसाठी. एक पाऊल समृद्ध जीवनासाठी " या संकल्पनेतून अल्पवयीन बालकांमधील ड्रग्ज व इतर मादक पदार्थांचा प्रसार व प्रतिबंध या विषयावर दि.12 जुलै ते दि.15 ऑगस्ट 2024 पर्यंत विविध शिक्षण संस्थेत मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणेत आले आहे.सदर मोफत मार्गदर्शन शिबिराची सुरुवात शुक्रवार दि.12 जुलै 2024 रोजी इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरातील इचलकरंजी महापालिका संचालित डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर क्र.43, हुतात्मा अब्दुल हमीद विद्यामंदिर क्र.14, राजीव गांधी विद्यामंदिर क्र.55 व पं. मोतीलाल नेहरू विद्यामंदिर क्र.36 एकत्रित या शाळेतील इयत्ता 06वी व 07 वी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणेत आले. सदर मार्गदर्शन शिबिराचे प्रमुख वक्ते नारायणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, इचलकरंजी चे डॉ. लक्ष नारंग (M.B.B.S, M.D) होते. त्यांनी ड्रग्ज व इतर विविध मादक पदार्थांचे प्रसार व त्यातून जीवनात व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, ड्रग्स व इतर मादक पदार्थांचे व्यसन व त्यातून वाढती गुन्हेगारी व ड्रग्ज व मादक पदार्थांचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना संदर्भात विध्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मोफत मार्गदर्शन शिबिराची सुरुवात दीपप्रज्वलन करून करणेत आली, प्रास्ताविक डॉ. सरोजिनी नायडू विद्यामंदिर क्र.43 चे शिक्षक आत्माराम गायकवाड यांनी केले तर आभार हुतात्मा अब्दुल हमीद विद्यामंदिर क्र.14 चे मुख्याध्यापक सरदार मगदूम यांनी केले. आगामी एक महिन्याच्या कालावधीत इचलकरंजी शहर व परिसरातील अनेक शाळा व कॉलेज च्या 06 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी देखील मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून शक्य तितके विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळवून देण्याचा निर्धार रयत सोशल फौंडेशन चे संस्थापक अभिषेक पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी अभिषेक पाटील, पांडुरंग पवार, राहुल मिणेकर, गणेश साळुंखे, सुनील हिंगलजे, अर्जुन बागडे, शुभम धूळशेटे आदींसह शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post