आनंदराव पाटील प्रशालेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा
कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील भारती विद्यापीठ पुणे संचलित आनंदराव पाटील प्रशालेमध्ये व्यास गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला !! मातृदेवो भव! पितृ देवो भव! आचार्य देवो भव!! या उक्तीप्रमाणे आपले आई-बाबा हे आपले प्रथम गुरु असतात त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी प्रशालेमध्ये आई-बाबांचे पाद्यपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे अध्यक्ष माननीय डॉक्टर एमजी गुरव तर भारती विद्यापीठ पुणे चे कार्याध्यक्ष माननीय आनंदराव दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक आर के पाटील सर होते सर्व शिक्षक पालक व महिला पालक तसेच विद्यार्थी प्रतिनिधी प्रणवी पाटील विद्यार्थी प्रतिनिधी सूर्या पाटील हजर होते सदर कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले होते सार्थक कांबळे शिवराज पाटील मनीष पाटील समीक्षा पाटील नीलम पाटील ज्योती कांबळे प्रतीक्षा पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षक व आपले आई बाबा विषयी आदर व्यक्त केला सिद्धीका आणि अमृता पाटील यांनी आई विषयी कविता सादर केली. डॉक्टर एमजी गुरव सर यांनी आपल्या काही कविता सादर करून अशा कार्यक्रमाची गरज आज का आहे ते विशद करून सांगितले यावेळी पालकांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करून औक्षण केले आणि पुष्पवृष्टी करत प्रशालेमध्ये स्वागत करण्यात आले प्रथम आपले आद्यगुरू व्यास ऋषीमुनींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले प्रशालेचे मुख्याध्यापक आर के पाटील सर यांनी पाहुण्यांचे स्वागत करून गुरुपौर्णिमे विषयी सविस्तर माहिती सांगितली आपल्या जीवनात आई-वडिलांचे स्थान किती महत्त्वाचे आहे त्याचे अनेक दाखले देऊन मार्गदर्शन केले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी व्यासपीठावरील प्रमुख अतिथींचे पाद्यपूजन करून त्यांना गुलाब पुष्प दिले यावेळी पाहुण्याने मुलांचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले या कार्यक्रमानंतर सर्व मुलांनी आपल्या आई-बाबांचे पाद्यपूजन केले आणि आपल्या आई-बाबांना त्यांनी मिठी मारली या भावपूर्ण कार्यक्रमांमध्ये सर्वच माता-पितां गहिवरले त्यांना अश्रू अनावर झाले होते मोबाईलच्या या काळात आई-वडिलांबद्दल प्रेम कृतज्ञता आदर व्यक्त करणारा हा संस्कारक्षम उपक्रम प्रशालेत घेतल्यामुळे मान्यवर व पालक खूप आनंदीत झाले होते असेच संस्कारक्षम उपक्रम प्रशालेमध्ये घडावेत असे पालकांनी आपल्या मनोगतातून इच्छा व्यक्त करून कार्यक्रमाचे कौतुक केले यानंतर विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या शाळेतील सर्व शिक्षक व माता-पित्यांचे पाद्यपूजन करून त्यांचे औक्षण केले व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त केले अशा प्रकारे गुरुपौर्णिमेनिमित्त आई-वडिलांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण कार्यक्रम प्रशालेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रम पार पाडण्यासाठी भालचिंम सर युवराज लाड सर खतकर मॅडम कांबळे मॅडम पूजा पाटील मॅडम देशमुख सर समीर पाटील सर तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील.