जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेच्यावतीने स्वखर्चातून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे केले मुरुमीकरण
कोळींद्रे येथील जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेच्यावतीने कोळींद्रे ते नेसरी या मेन रोडवर पावसामुळे पडलेले खड्डे व चरी संस्थेच्या स्वखर्चातून मुजविण्यात आले. सदर रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्डे व चरी पडल्यामुळे टू व्हीलरचे मोठ्या प्रमाणात एक्सीडेंट होत होते. त्यामुळे संस्थेच्या सदस्यांनी संस्थेच्या स्वखर्चातून मुरुमीकरण करून एक सामाजिक कार्य केले आहे. संस्थेने केलेल्या या सामाजिक कार्याबद्दल संस्थेचे व संस्थेच्या सदस्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी समाजसेवक नरसु शिंदे, सुरेश गवळी, आनंदा सुतार, अमर मटकर, संतराम कुऱ्हाडे, संतोष शिंदे, आप्पा नारकर आदी सदस्य उपस्थित होते.