भाजप व अथायु हॉस्पिटल यांच्यावतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराचा १२३८ रुग्णांनी घेतला लाभ
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी व अथायु मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या मोफत हृदयविकार व मुत्रविकार तपासणी व ऑपरेशन शिबीर संपन्न झाला. शिबीरामध्ये इचलकरंजी सह कबनुर, खोतवाडी, तारदाळ, कोरोची सह सुमारे १२३८ रुग्णांनी नोंदणी झाली होती तर त्यापैकी ५४ रुग्णांची सरकारच्या योजनेतून ऑपरेशनची शिफारस, १०१८ रुग्णांनी ब्लड प्रेशर, रक्त मधुमेहाची तपासणी करून घेतली, तर १०९ रुग्णांची ई.सी.जी करण्यात आली ६७ रुग्णांनी मूत्रविकार तपासणी केली. शिबीराचे उद्घाटन जवाहर छाबडा यांच्या हस्ते झाले. यावेळी शहराध्यक्ष पै अमृत मामा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी आम. सुरेशराव हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष मनोज हिंगमिरे, प्रसाद खोबरे, मनोज साळुंखे, पांडुरंग म्हातुगडे, उमाकांत दाभोळे, अरविंद चौगुले, भगवान बरगाले, राजू भाकरे, नामदेव सातपुते, चिदानंद कोटगी, प्रदीप कांबळे, शिवानंद रावळ, ऋषभ जैन, अर्जुन सुतार, हेमंत वरुटे, प्रदीप मळगे, सागर कचरे, अमिता बिरंजे, संगिता घोरपडे, नागुबाई लोंढे आदिंसह अथायु मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल कोल्हापूरचे तज्ञ डॉ आनंद सातपुते, डॉ अनुजा पाटील, मदन गोरे यांच्यासह मेडिकल स्टाफचे कर्मचारी उपस्थित होते.