जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेच्यावतीने महिलांसाठी आत्मनिर्भर मार्गदर्शन संपन्न

जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्थेच्यावतीने महिलांसाठी आत्मनिर्भर मार्गदर्शन संपन्न 



कोळिंद्रे येथील जनसेवा समाजसेवक नरसु शिंदे सामाजिक संस्था यांच्यावतीने विधवा व निराधार महिलांना आत्मनिर्भय बनवण्याचा संकल्प राबवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजरा तालुक्यातील हदेवाडी या गावांमध्ये संस्थेच्यावतीने महिलांसाठी आत्मनिर्भर मार्गदर्शन संपन्न झाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी प्रकाशजी गावडे होते तर प्रमुख पाहुणे महाराष्ट्र माझाचे पत्रकार पुंडलिक सुतार, अभिनेता एन.के.बाबा उपस्थित होते. या संकल्पमध्ये आत्मनिर्भर व स्वतःच्या पायावर महिलांनी कसे उभे राहायचे याचे मार्गदर्शन कृषी अधिकारी प्रकाशजी गावडे व अभिनेता एन.के.बाबा यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजना संदर्भात सविस्तर माहिती दिली यावेळी संस्थेचे अध्यक्ष समाजसेवक नरसु शिंदे, आनंदा सुतार, अमर मटकर, अक्षय फडके, संतराम कुराडे, विमल लोहर, विद्या राजाराम, सुनिता जाधव, शितल कदम, लक्ष्मी सुतार, नंदा शिऊरकर, अंजना हेबाळकर, अंबाबाई कांबळे, गीता जाधव, अनुसया मटकर आदिंसह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व हांदेवाडी येथील विधवा व निराधार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम कुऱ्हाडे यांनी केली. तर आभार पुंडलिक सुतार यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post