बेलेवाडी काळम्माच्या काळम्मा विकास सेवा संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली
कागल तालुक्यातील बेलेवाडी काळम्मा येथील काळम्मा विकास सेवा संस्थेची सन 2023-24 मध्ये सभासदांना वितरित केलेल्या कर्जाची बँक स्तरावर 100 % टक्के कर्ज वसुली करण्यात आली. कागल तालुक्यात सर्वाधिक सभासदांना लाभांश देणारी संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे. त्याचप्रमाणे बँक स्तरावर सलग 15 वर्षे 100% कर्ज वसुली करणारी संस्था व पारदर्शकपणे कामकाज व सभासदभिमुख कारभार केल्यामुळे संस्था सध्या कोट्यावधी रुपयांची उलाढाल करीत आहे. यामध्ये सभासदांच्या हिताचा विचार करूनच धोरण अवलंबले जाते संस्थेचे भाग भांडवल 60 लाख 74 हजार रुपये आहे. तर सध्या संस्थेचे 833 सभासद आहेत. ठेवी व गुंतवणक 64 लाख 71 हजार आहे तर संस्थेची वार्षिक उलाढाल 3 कोटी 63 लाख 90 हजार इतकी आहे संस्थेने सभासदांना ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज, म्हैस प्रकरण आणि सभासदांना पाईपलाईन मारण्यासाठी व शेतजमीन बसवण्यासाठी सुद्धा कर्ज वाटप केले आहे गटातटाचे राजकारण न करता सर्वपक्षीय संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज उत्तमरीत्या चालू आहे बँक स्तरावर सलग 15 वर्षे वसुली होत असल्यामुळे सभासदांना व संस्थेला आर्थिक लाभ मिळत आहे शंभर टक्के कर्ज वसुली झाल्यामुळे संस्थेला अधिक आर्थिक सहाय्य उपलब्ध होणार आहे त्यामुळे सभासदांना जास्तीत जास्त कर्जवाटप होणार असल्याचे चेअरमन तानाजी विष्णू पाटील व व्हाईस चेअरमन सौ.शुभांगी रमेश पाटील व सचिव आनंदा आंबिलढोके यांनी सांगितले तसेच के.डी.सी.बँक शाखा कासारी निरीक्षक दगडू हरेल आणी स्टाफ व काळम्मा विकास संस्थेच्या सर्व संचालक व लिपिक यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे चेअरमन तानाजी पाटील यांनी सांगितले
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील