आभाळ मायेचे नेतृत्व व दातृत्व म्हणजे बोरगांवचे रावसाहेब पाटील, मंत्री-हसन मुश्रीफ
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय व शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी आज बोरगाव येथे रावसाहेब पाटील यांच्या कुटुंबीयास भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच युवा नेते उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांना धीर दिला. याप्रसंगी नाम हसन मुश्रीफ साहेब यांनी दादा व त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की रावसाहेब पाटील यांच्यासारखे मनमिळावू व आभाळ मायेच नेतृत्व पुन्हा होणे नाही,दादा हे केवळ कर्नाटक पुरतेच सिमित नव्हते तर जवळच्या महाराष्ट्र राज्यातील जनतेला विकासाच्या माध्यमातुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.महापूर व कोरोना वेळीं त्यांनी केलेली मदत ही वाखण्यासरखीच आहे.असे भावपूर्ण उदगार् महाराष्ट्राचे मंत्री नाम.हसन मुश्रीफ यांनी काढले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व युवा नेते उत्तम पाटील, अभिनंदन पाटील, पाटील कुटुंबीय, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहुन अजित कांबळे