महायुती सरकारच्या निर्धाराचे भाजपा महिला मोर्चा वतीने साखर-पेढे वाटून आनंदत्सव साजरा

महायुती सरकारच्या निर्धाराचे भाजपा महिला मोर्चा वतीने साखर-पेढे वाटून आनंदत्सव साजरा 


महायुती सरकार महिलांचे साठी आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण महायुती सरकार नेहमीच कट्टिबंध विकासासाठी तरतूद राज्य शासनाच्या वतीने ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ मुख्यमंत्रीअन्नपूर्णा तीन गॅस सिलेंडर मोफत,तसेच बारावीनंतर पदवीधर शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण  महिला बचत सक्षमीकरण अश्या अनेक योजना आणल्या बद्दल भाजपा महिला मोर्चाच्या वतीने या महायुती सरकाराच्या निर्णयाचे स्वागत करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिलांचे सक्षमीकरण, हेच महायुती सरकारचे धोरण या उद्देशानुसार राज्य शासनाकडून महिलांसाठी विविध योजना जाहीर करुन त्याची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. तर पावसाळी अधिवेशनातील अर्थसंकल्पात ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनामार्फत दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहेत. अर्थसंकल्पात ’मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने बरोबरच इतर योजनाची हि घोषणा केल्याबद्दल इचलकरंजी भाजपा महिला मोर्चा वतीने कॉ. मलाबाद जनता चौक येथे साखर पेढे वाटप करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव  साजरा करण्यात आला.यावेळी पुनम भोसले, योगिता दाभोळे, निता भोसले, नागुताई लोंढे, माधवी मुंढे, गंगा पाटील, भारती शिरपुरे, रेखा आरेकर, शबाना शहा, मुधुमती तोरगुले, मनिषा नाईक, कौशल्या गाडे, विद्या सुतार, संगिता कांबळे सुशमा पाटील, संकपाळ वहिनी, रेश्मा शेख, इंगवले वहिनी, शहराध्यक्ष पै.अमृत भोसले, सगायो अध्यक्ष अनिल डाळ्या, युवा अध्यक्ष जयेश बुगड, राजेश रजपुते, दिपक पाटील, सलीम शिकलगार, मनोज बनसोडे, जिलानी टाकवडे, भाजपा कार्यकर्ते व महिला मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post