बेलेवाडी काळम्मा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाळासो सुतार यांची बिनविरोध निवड
बेलेवाडी काळम्मा येथील उपसरपंच सौ गीतांजली पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी बाळासो गुंडू सुतार यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज दाखल केला होता अन्य कोणताही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच कु.अबोली कांबळे यांनी बाळासो सुतार यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले निवड जाहीर होतात सुतार समर्थकांनी फटाक्याची आतषबाजीसह गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला काळम्मा बेलेवाडी ग्रामपंचायत येथे गुरुवारी उपसरपंच पदासाठी निवडी संदर्भात विशेष सभा बोलवण्यात आली होती सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच कु.अबोली कांबळे होत्या यावेळी ग्रामसेवक राजेंद्र सातवेकर ग्रा.पं.सदस्य अनिल पाटील अजित पाटील बजरंग कांबळे सौ गीतांजली पाटील सौ सौ नजरीन देसाई सौ विद्या पाटील सौ सोनाबाई पाटील आदी उपस्थित होते या निवडीनंतर माजी उपसरपंच सौ गीतांजली पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नूतन उपसरपंच बाळासो सुतार म्हणाले सर्व सदस्यांनी मला उपसरपंच म्हणून काम करण्याची संधी दिली त्यामुळे सदस्यांचा मी आभारी आहे माझ्या कारकिर्दीत काळम्मा बेलेवाडी परिसरातील सर्व विकासकामे करण्यासाठी सर्वांना घेऊन काम करण्याची ग्वाही दिली निश्चितच येत्या सहा महिन्यात काळम्मा बेलेवाडी परिसरात अनेक विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न करणार आहे या माझ्या निवडीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसनसो मुश्रीफ व माजी आमदार संजय बाबा घाटगे तंटामुक्तीचे शशिकांत देसाई सागर पाटील हरी पाटील बाजीराव पाटील यांच्यासह गावातील लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले येथील ग्रामपंचायत मध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय बाबा घाटगे गटाच्या युतीची सत्ता आहे यावेळी माजी सरपंच दीपक शिंदे बाळू साळुंखे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी ग्रामस्थ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शेवटी आभार बजरंग कांबळे यांनी मांनले.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील