बोरगाव येथे अरिहंत सभागृहात 29 जुन रोजी श्रध्दांजली सभेचे आयोजन

बोरगाव येथे अरिहंत सभागृहात 29 जुन रोजी श्रध्दांजली सभेचे आयोजन 


बोरगाव येथील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष व अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष, सहकार रत्न, आमच्या संस्थेचे आधारस्तंभ व मार्गदर्शक श्रावक रत्न  श्री रावसाहेब आनगोंडा पाटील यांचे दिनांक 25 जून 2024 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. अरिहंत उद्योग समूहाच्या अंतर्गत असणाऱ्या सर्व संस्थेच्या वतीने शनिवार  दिनांक 29 जून रोजी सकाळी अकरा वाजता श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी बोरगाव सह परिसरातील अरिहंत शी निगडित असणाऱ्या सर्व संस्थांचे संचालक ,कर्मचारी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात येत आहे. स्वर्गीय, सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांनी  1990 साली बोरगाव या खेड्यात श्री अरिहंत  क्रेडिट सोसायटीच्या  माध्यमातुन छोटसं रोपट लावून परिसरात सहकार्याची मुहूर्त मेढ उभी केली होती.आज त्यांचे वटवृक्षात रूपांतर झालेले दिसत आहे .यामध्ये श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट, विविध उद्योशगळ प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ निमित्त बोरगाव, श्री अरिहंत रुरल डेव्हलपमेंट सोसायटी बोरगाव, श्री अरिहंत शुगर इंडस्ट्रीज, श्री अरिहंत हॉस्पिटल बेळगाव, श्री अरिहंत सुतगिरणी, अरिहंत दूध उत्पादक संघ,श्री अरिहंत महिला गारमेंट, श्री अरिहंत कृषी सेवा केंद्र ,श्री अरिहंत रास्त भाव दुकान अश्या अनेक संघटना निर्माण झाली आहेत. अरिहंत उद्योग समूह संबंधित सर्व संस्थांचे पदाधिकारी व कर्मचारी ,संचालक मंडळ यांनी 29 जुन रोजी सकाळी अकरा वाजता श्री अरिहंत सभागृह या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण कार्य क्रमात उपस्थीत रहावे.

बोरगांवहुन - अजित कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post