यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने पाडळी ग्रामपंचायत सन्मानित
पाडळी गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती निमित्त जिल्हा परिषद, कोल्हापूर यांचेकडून देण्यात येणाऱ्या यशवंत ग्रामपंचायत पुरस्काराने ग्रामपंचायत पाडळीस सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री.हसन मुश्रीफ साहेब यांच्या हस्ते पुरस्कार स्विकारताना सरपंच सौ.ऐश्वर्या पाटील, उपसरपंच श्री.शिवाजी जाधव, ग्रामसेवक श्री.प्रभाकर परीट, सदस्य सौ.डॉ.विभा पाटील, सौ.सुजाता पाटील, सौ.भाग्यश्री गायकवाड, श्री.रवींद्र पाटील, श्री श्रीधर पाटील, श्री.कोंडीबा पोवार, श्री.निवृत्ती वाघमोडे तसेच कामधेनू दूध संस्थेचे चेअरमन श्री.मोहन पाटील, श्री विनोद पाटील, श्री.व्ही.बी.पाटील सर, श्री.धनंजय देसाई सरकार, श्री.राजेन्द्र मुळीक, श्री.निवृत्ती गायकवाड, श्री. अजित पाटील, श्री.धनाजी दाभाडे, लिपिक आश्विन गुरव, संतोष पोवार व कर्मचारी श्री.पांडुरंग मुळीक उपस्थित होते.
वसुंधरा शक्ती न्यूजसाठी अंबपहून किशोर जासुद