निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने घेतली खा.धैर्यशील माने यांची भेट

 निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने घेतली खासदार धैर्यशील माने यांची भेट 



सीमा प्रश्नामुळे कर्नाटक सीमा भागातील हजारो युवकांचे शैक्षणिकसह इतर बाजूने नुकसान होत आहे. आता हा प्रश्न अंतिमटप्प्यात आला असून लवकरच मराठी बांधवांच्या बाजूने निकाल लागेल. तोपर्यंत प्रत्येकांनी सनदशीर मार्गाने लढा दिला पाहिजे. सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लवकरच बैठक घेऊ अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी दिली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांची निपाणीतील महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली. यावेळी माने यांचा सत्कार करण्यात आला.त्यावेळी माने बोलत होते. युवा समितीच्या पदा धिकाऱ्यांनी खासदार माने यांना बेळगाव सीमा प्रश्नावर लोकसभेत मुद्दा मांडून त्यावर लवकरात सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारकडे तगादा लावण्याबद्दल विनंती केली. शिवाय सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबीत असलेल्या खटल्याला चालना देण्यासाठी शासन पातळीवर जागृती निर्माण करून लक्ष वेधण्याबद्दल प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. त्यावेळी निपाणी येथील महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सुनील किरळे, तात्यासाहेब कांबळे, विक्रम शिंदे, गजानन पाटील, गणेश शिंदे, वैभव माने यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post