महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी श्री अग्रसेन महिला मंडळतर्फे मार्गदर्शन कार्यक्रम तरी महिलांनी याचा लाभ घ्यावा
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या उद्देशाने श्री अग्रसेन महिला मंडळाच्या वतीने सोमवार दि २४ जून रोजी सायं. ४ वाजता श्री. अग्रसेन भवन, कागवाडे मळा येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.गेट फायनान्शली फिटः ए वुमन्स गाइड टू मनी मॅनेजमेंट या कार्यक्रमामध्ये महिलांना आर्थिक व्यवस्थापन व नियोजन कसे करावे, गुंतवणूक, बचत इत्याादि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सी.ए.सौ. सरिता जीवन ओसवाल व सौ. वृंदा नितीन अग्रवाल या उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे "प्रमुख पाहुण्या म्हणून सौ. सुनीता दालमिया व सौ. रेणू टिबरेवाल उपस्थित राहतील. आपल्या सर्वांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन श्री अग्रसेन महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सरला गजबी व सचिव सौ. स्मिता गोयल यांच्या वतीने करण्यात आले आहे.